Murlidhar Mohol | काँग्रेसचा श्रीराम द्वेष पुन्हा एकदा अधोरेखित झाला, मुरलीधर मोहोळ यांचे टीकास्त्र

Murlidhar Mohol: काँग्रेसचा श्रीराम द्वेष पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. प्रचारादरम्यान प्रभू रामाच्या फोटोचा वापर केल्याने काँग्रेसने आमच्याविरोधात तक्रार केली आहे. पण प्रभू राम आमचे आहेत आणि आम्ही प्रभू रामाचे आहोत, त्यामुळे त्यांच्या तक्रारीने आम्हाला फरक पडत नाही, असे पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, काँग्रेसने नेहमी रामविरोधी भूमिका घेतली आहे. अयोध्येत भाजप सरकारने रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा लोकसभा निवडणुकीनंतर करावी, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. अयोध्येतील सोहळ्याला काँग्रेसचा एकही नेता गेला नाही. आता आम्ही प्रभू रामाचा फोटो वापरल्याने त्यांनी तक्रार केलीय. तुम्ही अशा हजार तक्रारी करा, याने आम्हाला फरक पडत नाही. पण या निमित्ताने काँग्रेसचे खरे रूप पुन्हा एकदा पुणेकरांपुढे आले आहे, अशी टीका मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले