भाजपच्याच नेत्यांकडून पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचा कट; बावनकुळेंच्या दाव्याने खळबळ   

बीड –  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज एक गौप्यस्फोट केला असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपच्याच नेत्यांकडून (BJP Leader) पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत.(Conspiracy to defame Pankaja Munde by BJP leaders – Bawankule)

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे स्वतः मराठवाड्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात प्रचारसभा घेत आहेत. दरम्यान त्यांनी जालना येथे देखील प्रचार सभा घेतली. याचवेळी ‘एबीपी माझा’ला प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

भाजपमधीलच एक युनिट पंकजा मुंडे आणि पक्षाची बदनामी करत आहेत. कोणीतरी हे जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करत आहे असं ते म्हणाले. दरम्यान, पंकजा मुंडेंची बदनामी कोण करतंय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.