Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमान कोसळलं, 16 मृतदेह बाहेर काढले

Nepal Plane Crash : नेपाळमध्ये (Nepal) एक मोठा विमान अपघात (plane crash) झाला आहे. पोखराजवळ यती एअरलाईन्सचे (Airlines) विमान कोसळले आहे. या विमान अपघातातील मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. अपघाताचा बळी ठरलेल्या यति एअरलाइन्सच्या AT-72 विमानात एकूण 68 प्रवासी होते. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बचावकार्य सातत्याने सुरू आहे. यती एअरलाईन्सचे विमान काठमांडूहून पोखरा जात होते. या विमानात 11 परदेशी प्रवासी होते आणि 3 मुलेही होती.

यति एअरलाइन्सच्या AT-72 विमानात 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. अपघातानंतर विमानात बसलेल्या सर्व प्रवाशांची यादीही समोर आली आहे. विमानात 53 नेपाळी, 5 भारतीय, 4 रशियन, 1 आयरिश, 2 कोरियन, 1 अर्जेंटिनियन आणि एक फ्रेंच नागरिक होते. विमानतळ प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे. खाली दाखवलेल्या चित्रांमध्ये विमानातील सर्व प्रवाशांची नावे आहेत.

पोखरा विमानतळावर (Pokhara Airport) प्रवासी विमान अपघातानंतर नेपाळ सरकारने (Government of Nepal) मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या विमान अपघाताबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे की, पोखरा नवीन विमानतळाचे उद्घाटन झाले तेव्हा या ATR-72 विमानाचे डेमो करण्यात आले होते. विमानतळाच्या उद्घाटनानिमित्त या विमानाने डेमो उड्डाण घेतले होते आणि आज यती एअरलाइन्सचे हे विमान कोसळले आहे.

या विमानाबाबत माहिती समोर आली आहे की लँडिंगपूर्वी विमानाला हवेत आग लागली. यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी नेपाळी मीडिया द काठमांडू पोस्टला सांगितले की, यती एअरलाइन्सच्या विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हे विमान कोसळले. अपघातानंतर पोखरा विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पोखरा विमानतळाजवळ हा विमान अपघात झाला.