Sidhu Moosewala | सिध्दू मूसेवालाचा जवळचा मित्र बंटी बेन्सवर प्राणघातक हल्ला, मोहाली रेस्टॉरंटमध्ये गोळ्या झाडल्या

Sidhu Moosewala Close Friend Bunty Bains Attack : दिवंगत गायक सिध्दू मूसेवालाचे जवळचा मित्र, पंजाबी संगीतकार आणि गायक बंटी बेन्स मोहालीमध्ये (Mohali) झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावला. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बंटी पंजाबमधील मोहाली येथील सेक्टर 79 येथील एका रेस्टॉरंटमध्ये होता. यावेळी त्याच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र, तो सुखरूप पळून जाण्यात यशस्वी ठरला.

हल्ल्यानंतर बंटी बेन्स याला धमकीचा फोनही आला होता ज्यामध्ये एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी बंटीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या क्लिपमध्ये खिडक्यांच्या काचेला तडे गेले आहेत आणि लाकडी चौकटीत बुलेटचे छिद्र दिसत आहेत.रिपोर्ट्सनुसार, बंटी बेन्सला ही धमकी लकी पटियाल नावाच्या व्यक्तीकडून मिळाली आहे. हे नाव बंबिहा आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीशी जोडले गेल्याच्या अफवा आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

बंटी बेन्स हा सिद्धू मूसेवाला याच्या जवळचा आहे
हत्येच्या प्रयत्नानंतर बेन्सने इंडिया टुडेशी संवाद साधला. त्याच्या वेदनादायक अनुभवाची आठवण करून देताना त्याने सांगितले की, हल्ल्यानंतर त्याला खंडणीचा धमकीचा फोनही आला होता ज्यामध्ये त्याच्याकडून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. बंटी बेन्स सिद्धू मूसवाला (Sidhu Moosewala) याच्या खूप जवळ होता. सिद्धू हयात असताना, बंटीने त्याचे काम आणि व्यवसायाची काळजी घेतली. निर्माता आणि टॅलेंट मॅनेजमेंट म्हणून तो त्याच्या कामासाठी ओळखले जात असे.

2022 मध्ये सिद्धू मूसेवाला खून प्रकरण
मे 2022 मध्ये सिद्धू मूसेवाला याची पंजाबमधील मानसा जिल्ह्यात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार सिद्धूला मृत अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. पंजाब पोलिसांनी त्याची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली होती. सिद्धू मूसेवालाची सर्व गाणी प्रचंड हिट झाली होती आणि त्यांचे चाहते खूप होते.

महत्वाच्या बातम्या : 

Maharashtra Politics | ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ , विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध

जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन : Rajesh Tope

Interim Budget | राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी