सुप्रिया सुळेंच्या साडीला लागली आग, उद्घाटन कार्यक्रमात घडली घटना!

Supriya sule : पुण्यातील एका कार्यक्रमाचे उद्घाटन करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्या साडीने अचाकनपणे पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही. साडीला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी ती विझवली.(Supriya Sule’s saree caught fire, the incident happened at the inauguration program!) .

हिंजवडीमध्ये कराटे क्लासेसचं प्रशिक्षण केंद्र आहे. त्या क्लासचे आज उद्घटन होतं. याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) यांना बोलवलं होतं. यावेळी दीप प्रज्वलन करताना सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule)  साडीला आग लागली. त्यावेळी उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीनं साडीला आग लागल्याचं निदर्शनास आणून दिलं. त्यावेळी तात्काळ साडीला लागलेली आग विजवण्यात आली.