पुण्यातील शिवसेना कात टाकणार; नव्याने शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार

पुणे – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे पुणे शहरातील शिवसैनिकांचा मेळावा झाला. त्या वेळी पुणे शहर प्रमुख म्हणून प्रमोद भानगिरे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच युवासेना राज्य सचिव म्हणून किरण साळी यांची सहसंपर्कप्रमुख म्हणून अजय भोसले, पुणे जिल्हा प्रमुख म्हणून रमेश कोंडे यांची नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान, आता या नंतरआज पुणे शहरात डेक्कन येथे पुणे शहरातील आजी माजी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आजच्या बैठकीमध्ये शिवसेना व युवा सेनेची पुन्हा एकदा एक चांगली संघटनात्मक बांधणी करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व युती सरकारने जे चांगले निर्णय गेल्या काही दिवसात घेतले ते निर्णय पुणेकरांना पर्यंत पोहोचवण्यासाठी भविष्यात आम्ही प्रयत्न करणार आहोत असं भानगिरे यांनी सांगितले.तसेच लवकरच पुणे शहरातील आठही विभागनिहाय बैठका घेऊन नव्याने पुणे शहरातील शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला.