समाजाला आवश्यक असणारे नवनवीन कार्यक्रम राबवायला हवेत – चंद्रकांत पाटील 

कोरोना काळात स्वच्छता कर्मचारी रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत होते, आपण त्यांचे ऋण व्यक्त करायला हवेत - पाटील

पुणे –  137 कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाच्या पंतप्रधाला  स्वच्छतेबाबत आवाहन करावे लागणे हे अनेकांना आश्यर्य वाटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेसाठी देशभरातील स्वच्छतेबाबत जनतेकडे आग्रह धरला होता. २०१४ पूर्वी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसायचे. मात्र मोदीजी यांच्या आवाहनानंतर जनतेनेही उत्तम प्रतिसाद दिला असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी म्हटले आहे.

स्वच्छतेचा नमो करंडक या बहुचर्चीत स्पर्धेचा आज शानदार बक्षीस वितरण सोहळा चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजप शहर सरचिटणीसराजेश पांडे, संत गाडगे महाराजांचे वंशज योगेश जाणोरकर, गायक सलील कुलकर्णी, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्त्रबुद्धे, माजी नगरसेवक दीपक  पोटे, भाजप नेते पुनीत जोशी,  जुन्नर शहर भाजपा शहराध्यक्ष सचिन खत्री, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, विनायक  आंबेकर, सिनेट सदस्य प्रसेनजीत फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले,  कोरोनाच्या काळामध्ये घरामध्ये असतानाही भीती वाटायची. परंतु स्वच्छता कर्मचारी रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत होते, आपण त्यांचे ऋण व्यक्त करायला हवेत. समाजाला आवश्यक असणारे नवनवीन कार्यक्रम राबवायला हवेत. समाजाची आवश्यकता लक्षात घेवून ज्यावेळी आपण कार्यक्रम आखतो त्यावेळी समाजाचा त्याला पाठिंबा मिळतो. लोकांच्या उत्साह देखील या स्पर्धेत चांगला दिसून आला. गिरीश खत्री आणि त्यांच्या टीमचे याबद्दल अभिनंदन आहे. त्यांनी असेच उपक्रम येणाऱ्या काळामध्ये देखील राबवावेत अशा शुभेच्छा पाटील यांनी यावेळी दिल्या.

आयोजक गिरीश खत्री म्हणाले,.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून एक स्वच्छतेचा संदेश दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशापुढे स्वच्छतेसाठी नवीन आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हा संदेश आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे गेल्या वर्षीपासून स्वच्छतेचा नमो करंडक ही स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेत गेल्यावर्षी ४२ तर यावर्षी तब्बल ९० सोसायट्यांनी सहभाग नोंदवला. या माध्यमातून जवळपास १२ हजार घरे आणि २५ हजार लोकांपर्यंत आम्ही पोहचलो. भाजपचे कार्यकर्ते आज पुणे शहरात वेगवेगळ्या भागामध्ये असे कार्यक्रम घेत आहेत. पुणे शहराला अभिमान वाटेल असा कार्यक्रम आम्ही नक्कीच भविष्यात करणार आहोत आज आपण पाहतोय की या स्वच्छ भारत अभियानाने चळवळीचे स्वरूप धारण केले आहे. एका जनआंदोलनाच्या स्वरुपात हे सर्व सुरु आहे. स्वच्छतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहचवणे हा या अभियानाचा उद्देश आहे आणि तोच उपक्रम किंवा त्याच माध्यमातून हे काम आम्ही पुढे नेत आहोत. इतर उत्सवाप्रमाणे स्वच्छता हाही एक उत्सव व्हावा या उद्देशाने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.असं ते म्हणाले.

यावेळी सलील कुलकर्णी म्हणाले, स्पर्धा हा भाग जितका महत्वाचा आहे त्यापेक्षा महत्वाचा हा उपक्रम आहे. सोसायटी हे देशाचे रिप्रेझेंटेशन आहे.देशात ज्याप्रमाणे विविध विचारांची लोकं असतात त्याप्रमाणे सोसायटीत देखील अशी लोकं असतात.जेव्हा एखादी सोसायटी स्वच्छ भारत अभियानासाठी अशा पद्धतीने तयार होते ते खरोखर कौतुकास्पद आहे.या निमिताने लोक एकत्र येत आहेत याचे कौतुकच आहे.

विजेते
गट 0-10 वर्षे
प्रथम -पराग सहकारी सोसायटी
द्वितीय – अनंत रुक्मणी को ऑप हाउसिंग सोसायटी
तृतीय – अलंकापुरीश्री को आँप हाउसिंग सोसायटी
उत्तेजनार्थ – K52 को ऑप हाउसिंग सोसायटी

गट 11 ते 20 वर्ष
प्रथम – अनमोल हाईट
द्वितीय – रत्नदीप हाउसिंग सोसायटी
तृतीय –  प्राची हाउसिंग सोसायटी
उत्तेजनार्थ – भूषण अपार्टमेंट

21 ते 30 वर्ष

प्रथम – मिनल गार्डन को ऑप हाउसिंग सोसायटी
द्वितीय – प्रज्ञानंद अपार्टमेंट
तृतीय  – कुलकर्णी कॉम्प्लेक्स
उत्तेजनार्थ  – साकेत अपार्टमेंट

गट –  31 ते 60 वर्षे

प्रथम – सौरभ को ऑफ हाउसिंग सोसायटी
द्वितीय –  यशश्री सदन
तृतीय –   यजुर्वेद सहकारी गृहरचना
उत्तेजनार्थ  – देवदत्तकृपा हाऊसिंग सोसायटी

गट – बंगलो सोसायटी

प्रथम – स्वस्तिश्री ऑप हाउसिंग सोसायटी
द्वितीय – शैलेश ऑप हाउसिंग सोसायटी
तृतीय – मनमोहन ऑप हाउसिंग सोसापटी
उत्तेजनार्थ – श्रीयश को ऑप हाउसिंग सोसायटी

गट – मोठ्या सोसायटी
प्रथम – राहुल टॉवर्स को ऑप हाउसिंग सोसायटी
द्वितीय –  व्हायोला को ऑप हाउसिंग सोसायटी
तृतीय -काकडे सिटी बिल्डिंग को ऑप हाउसिंग सोसायटी लिमिटेड
उत्तेजनार्थ –  अवनीश अपार्टमेंट
स्वच्छता श्री –  हिमाली रेसिडेन्सियत को और हाउसिंग सोसायटी लिमिटेड
स्वच्छता लक्ष्मी – युनायटेड वेस्टर्न को ऑप हाउसिंग सोसायटी
स्वच्छता वसुंधरा –  संकुल को ऑप हाउसिंग सोसायटी