रवींद्र धंगेकर कसब्यातील मतदारांवरच करत आहेत पैसे घेतल्याचा आरोप?

Pune – पुण्यातील कसबा (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. या दोन्ही मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी महायुती- मविआ आमने-सामने आहेत या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत.

कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपवर मोठा आरोप केला. भाजपकडून पोलिसांना हाताशी धरून पैसे वाटप केले जात असल्याचा खळबळजनक आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. पुण्यातील पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. त्यापूर्वीच रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. कसबा गणपतीसमोर पत्नीसह ते उपोषणाला बसत आहेत. धंगेकर यांच्यासोबत काँग्रेस नेतेही उपोषणाला बसत आहेत.

दरम्यान, धंगेकर यांच्या या आरोपांचा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी समाचार घेतला आहे. वारंवार पक्ष बदलणारे मविआचे उमेदवार हे कसब्यातील मतदारांवरच करत आहेत पैसे घेतल्याचा आरोप करत आहेत. ते सहानभूती मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. समोर पराभव दिसत असल्याने ते असे खोटे आरोप करत असल्याची टीका मुळीक यांनी केली आहे. काल प्रचार बंद झाल्यानंतर देखील ते खोटे आरोप करून ते एकप्रकारे प्रचार करत आहेत याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू असा थेट इशारा मुळीक यांनी दिला आहे.