आली लहर केला कहर! Ambati Rayuduचा आठवड्याभरातच राजकारणातून काढता पाय, म्हणाला…

Ambati Rayudu Steps Back From Politics:- आयपीएल 2024 सुरू होण्यास अजून बराच अवधी आहे. मार्चच्या अखेरीस 17 वा हंगाम सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. सध्या यासंबंधी कोणतेही अधिकृत अपडेट समोर आलेले नाही. पण त्याआधी चेन्नई सुपर किंग्जच्या (सीएसके, CSK) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी नक्कीच आली आहे. अलीकडेच चेन्नई सुपर किंग्जच्या एका खेळाडूने राजीनामा देऊन करोडो चाहत्यांना धक्का दिला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

टीम इंडिया आणि सीएसके टीमचा माजी क्रिकेटर अंबाती रायडूने वायएसआर काँग्रेस पार्टी सोडली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत त्यांनी आठवड्याभरापूर्वीच YSRC पक्षात प्रवेश केला होता. मात्र अचानक त्यांनी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

वास्तविक सीएसके संघाचा माजी क्रिकेटर अंबाती रायडूने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट केले. यादरम्यान वायएसआर काँग्रेस पार्टी सोडण्याचे कारण सांगताना त्यांनी लिहिले की, “मी वायएसआरसीपी पार्टी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मला कळवावेसे वाटते की मला काही काळ राजकारणापासून दूर राहायचे आहे. माझे पुढील पाऊल योग्य वेळी जाहीर केले जाईल, सर्वांचे आभार.”

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी जवळचे संबंध असलेले अंबाती रायडू गेल्या महिन्यात (28 डिसेंबर) वायएसआरसीपीमध्ये सामील झाले, तेव्हा ते आगामी लोकसभा निवडणुकीत गुंटूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचेही सांगण्यात आले. पण वायएसआर काँग्रेसच्या माध्यमातून दुसरी इनिंग सुरू करणाऱ्या रायडूने आठवडाभरातच राजकीय भूमिका बदलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी सीएसकेच्या माजी खेळाडूला काँग्रेस पक्षाकडून लोकसभेचे तिकीट मिळणे अशक्य असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. याच कारणामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते नव्या पक्षात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे.

अंबाती रायडूची कारकीर्द
टीम इंडियासाठी 55 एकदिवसीय सामने खेळलेल्या अंबाती रायडूने 3 शतके आणि 10 अर्धशतकांसह एकूण 1694 धावा केल्या आहेत. त्याने 6 टी-20 सामन्यात 42 धावा केल्या. याशिवाय, रायडूने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून 203 सामने खेळले आहेत आणि 1 शतक आणि 22 अर्धशतकांसह एकूण 4348 धावा केल्या आहेत. तसेच, रायडूने 2023 च्या अंतिम सामन्यात CSK कडून खेळून IPL क्रिकेटला अलविदा केला.

महत्वाच्या बातम्या-

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळवर होता दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आता झोपेतही वजन कमी करता येणार! जाणून घ्या Weight Lossच्या सोप्या टिप्स

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आपल्याला मंत्रीपदच काय आमदारकीची सुद्धा फिकीर नाही – मंत्री भुजबळ