New Yearला पाहुण्यांना द्या चटपटीत जेवणाची मेजवाणी! घरीच बनवा हॉटेलसारखा ‘चिकन शामी कबाब’

Chicken shaami kebab Recipe: कबाब (Kebab Recipe) हा एक असा नॉनव्हेज पदार्थ आहे, जो प्रत्येक डिनर पार्टीमध्ये आवडीने खाल्ला जातो. तसंही आता 2022वर्ष संपायला आणि नववर्ष (New Year Party) यायला, काही तासच उरले आहेत. त्यामुळे तुम्हीही नवीन वर्षाचे जोरदार सेलिब्रेशन करण्याच्या मूडमध्ये असाल. आणि सेलिब्रेशन म्हटल्यावर चटपटीत, मसालेदार, चविष्ठ तर असणारच. पण यंदाच्या पार्टीला आणखी खास व अविस्मरणीय बनवण्यासाठी जरा हटके आणि चवदार काहीतरी बनवूया. आम्ही तुमच्यासाठी कबाबचाच एक प्रकार घेऊन आलो आहोत, शामी कबाब. (Shaami Kabab)

शामी कबाब हे मटणापासून बनवले जात असले तरी तुम्हाला हवे असल्यास ते चिकनपासूनही बनवू शकता. उत्तर भारतात शामी कबाब खूप लोकप्रिय आहे. शामी कबाब हा लोकप्रिय स्नॅक्सपैकी एक आहे. त्याला तुम्ही तिखट चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

चिकन शामी कबाब (Chicken Shaami Kebab) बनवण्यासाठी लागणारी सामग्री:
चिकन शामी कबाब बनवण्यासाठी चिकनचे तुकडे, चणा डाळ आणि मसाल्यांमध्ये मिसळून त्याचे बारीक मिश्रण वाटून कबाब बनवतात. हे कुरकुरीत कबाब चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

1 कप चना डाळ
500 ग्रॅम चिकन थाई
2 चमचे मीठ
7 लाल मिरच्या
2 टीस्पून जिरे
2 टीस्पून धणे
7 लवंग
10 काळी मिरी
2 लहान दालचिनीच्या काड्या
1 टीस्पून ओवा
6 अंडी
1/2 कोथिंबीर बारीक चिरलेली
1 /2 पुदिन्याची पाने
6 हिरव्या मिरच्या
1 चमचे आले
10 लसूण पाकळ्या
तळण्यासाठी तेल

चिकन शामी कबाब कसा बनवायचा?
1. चना डाळमध्ये चिकन थाई आणि मसाले घालून हे मिश्रण पाण्यात उकळा. चिकनला मऊ होईपर्यंत शिजू द्या.
2. मग पाणी काढून टाका आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
3. नंतर 3 अंडी, चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पाने, हिरव्या मिरच्या, आले आणि लसूण घाला.
4. हे मिश्रण चांगले मिसळा आणि मिक्सरमधून बारीक करून घ्या.
5. बारीक वाटलेल्या मिश्रणापासून गोलाकार कबाब बनवा.
6. उरलेल्या अंड्यामध्ये कबाब कोट करा आणि पॅनमध्ये तळून घ्या.
7. तुम्ही चिंचेची चटणी किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत हे कबाब सर्व्ह करू शकता.