विमा काढण्यापूर्वी जाणून घ्या पॉलिसींचे प्रमुख प्रकार

आजच्या धकाधकीच्या जीवनात आयुष्य जगणे जोखमीचे झाले आहे . संपत्ती कमावणं एक वेळेला सोपे म्हणावे लागेल परंतु योग्य वेळी योग्य ठिकाणी पैशांचा विनियोग करणे आवश्यकज आहे . ज्या पद्धतीने शिक्षण , लग्न अशा बड्या खर्चासाठी वेगवेगळे सेविंग खाते आपण काढतो . त्याचपद्धतीने वेगवेगळे विमा प्रकार देखील आपल्याला ज्ञात असणे आवश्यक आहे . सध्या आरोग्याच्या दृष्टीने देखील विमा काढणे अत्यंत महत्वाचे आहे . परंतु आजच्या घडिले असेही अनेक जण आहेत जे कारचा विमा काढतील परंतु स्वतःच्या आरोग्यासाठी विमाचा विचार करणार नाहीत . चला तर मग पाहुयात विम्याचे प्रकार किती व कोणते .

टर्म प्लान : ( Term plan ) 

टर्म इन्शुरन्स हा सध्याचा जीवनविमा योजनेतील लोकप्रिय प्रकार आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला आयुष्यभरासाठी विमा संरक्षण मिळते. या प्लॅनचा हप्ता तुलनेने खूप कमी असतो. प्लॅनच्या कालावधीमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला तरच विम्याची रक्कम वारसाला मिळते. परंतु विमाधारकाला पॉलिसीदरम्यान काहीही झाले नाही तर भरलेला हप्ता वायाच जातो ! आपल्या पश्चात कुटुंबाचे आर्थिक हाल होऊ नयेत यासाठी हा पर्याय सर्वोत्तम ठरतो. 15-20 हजार रुपये वर्षाकाठी भरून तुम्ही 1 कोटींचा टर्म इन्शुरन्स घेऊ शकता.

एंडोमेंट प्लान : ( Endowment plan )
टर्म प्लानपेक्षा हा प्लान वेगळा असतो. पॉलिसीची मुदत संपल्यानंतर त्याचे फायदे पॉलिसीधारकाला मिळत असतात. तोपर्यंत ठरावीक हप्ते पॉलिसी धारकाला भरावे लागतात. त्यानंतर विम्याचे फायदे, बोनस मिळत असतात. यामध्ये पॉलिसीधारक जिवंत राहिल्यास त्याला किंवा मृत झाल्यास वारसाला याचे आर्थिक फायदे मिळतात. या योजनेचे शुल्क अधिक असल्याने हप्त्याची रक्कम जास्त असते. एंडोमेंट प्लानमध्ये असंख्य योजना उपलब्ध आहेत.

युलिप प्लान : ( ULIP plan )

यूनिट लिंकड इन्शुरन्स प्लान (यूलिप) हा पारंपरिक एंडोमेंट प्लानपेक्षा वेगळी असतो. ही योजना गुंतवणूक आणि विमा यांचा मेळ साधणारी आहे. यूलिपमधील असणारी रक्कम ही शेअरबाजारात गुंतवली जाते. असून आपण निवडलेल्या पॉलिसीमध्ये दाखवलेल्या कंपन्यांमध्ये आपला पैसा गुंतविला जातो. यूलिप प्लान आणि म्युच्युअल फंड यांच्यात साधर्म्य आढळते. बाजारातील चढ उताराचा फायदा यूलिप प्लानधारकांना मिळत असतो. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास यातून मिळणारा परतावा हा कोणत्याही मुदत ठेवीपेक्षा अधिक असतो. परंतु त्यासाठीी बाजारात गुंतवण्याची जोखीम पॉलिसीधारकाला घ्यावी लागते.

आजीवन विमा पॉलिसी : ( Lifetime insurance policy )

ही योजना पॉलिसीधारकाला आयुष्यभर विमा संरक्षण पुरवणारी आहे. या पॉलिसीचे वैशिष्ट्ये म्हणजे या पॉलिसीची वैधता कधीपर्यंत आहे, हे निश्चित केलेले नसते. पॉलिसीधारक त्याच्या मृत्यूपर्यंत नियमितपणे विमा हप्ता भरू शकतो.
मनी बॅक पॉलिसी: इंडोमेंट प्लानचाच भाग असणारी मनी बॅक पॉलिसी ही विम्याच्या सुरक्षाकवचासोबतच आर्थिक हातभारही देते. विमा हप्ता भरण्याची मुदत संपल्यानंतरही पॉलिसीधारकाला विम्याची रक्कम मिळत असते. अशा प्रकारचे प्लान पाल्यांसाठी उपयुक्त ठरतात. शिक्षणाच्या खर्चासाठी लागणारे पैसे आपण मनी बॅक पॉलिसीच्या माध्यमातून उपलब्ध करू शकतो.