Ganesh Festival 2022 : गणेशोत्सवात अफजलखान वधाचा देखावा नको; पोलिसांनी नाकारली परवानगी

पुणे – पुण्यातील संगम तरुण मंडळाने स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या अफजलखान वधाचा (Afzalkhan Vadh) जिवंत देखावा सादर करण्यासाठी कोथरूड पोलिसांकडे (Kothrud Police) परवानगी मागितली. दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी फजलखान वधाचा देखावा सादर करण्यासा नकार देत परवानगी नाकारली आहे. याप्रकरणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis) यांच्याकडे दाद मागणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी सांगीतले.

पोलिसांनी परवानगी नाकारली तरी संगम तरुण मंडळा (Sangam Tarun Mandal) देखावा सादर करण्यावर ठाम आहे. संगम तरुण मंडळा मंडळाचे अध्यक्ष किशोर शिंदे (Kishor Shinde) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. अफजलखान वधाचा देखावा दाखवण्यास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यामुळे हे मंडळ नाराज झाले आहे. देखाव्याची परवानगी मिळवण्याचा निर्धार या मंडळांनी व्यक्त केला आहे.