गंगाखेडमधील तिरंगा पदयात्रेला उत्तम प्रतिसाद; देशभक्तीपर घोषणांनी आसमंत दुमदुमला

गंगाखेड / विनायक आंधळे :– भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण (Independence Day) होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आजपासून ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गंगाखेड (ABVP Gangakhed) शहर शाखेच्या वतीने दि.13 ऑगस्ट 2022 शनिवार रोजी शहराच्या मुख्य बाजारपेठेतून 75 फूट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.

तिरंगा पदयात्रेचा मार्ग भगवती चौक, श्रीराम चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय ते उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी या भव्य पदयात्रेचा समारोप झाला. पदयात्रेची सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

यावेळी अभाविप गंगाखेड शाखेचे अध्यक्ष प्रा.अशोक केंद्रे (Ashok Kendre), शहरमंत्री वैष्णवी अनावडे (Vaishnavi Anawade), जिल्हा संयोजक अजय टोले (Ajay Tole), अभाविप कार्यकर्ते, प्राध्यापक, विद्यार्थी व सामान्य नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.