Raj Kundra | “जेव्हा तुम्हाला अपमानित…”, ईडीच्या कारवाईनंतर राज कुंद्रा याची लक्षवेधी पोस्ट

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई केली आहे. हे प्रकरण बिटकॉइनच्या वापराद्वारे गुंतवणूकदारांच्या निधीची फसवणूक करण्याशी संबंधित आहे. ईडीने गुरुवारी सांगितले की त्यांनी मनी लाँड्रिंगच्या (Money laundering) चौकशीचा एक भाग म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या पुण्यातील बंगला आणि इक्विटी शेअर्ससह 98 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. आता मालमत्ता जप्त केल्यानंतर राज कुंद्राची गुप्त नोट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

98 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्यानंतर, राज कुंद्राने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सिंहाच्या गर्जनेचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘जेव्हा तुम्हाला अपमानित वाटत असेल तेव्हा शांत राहायला शिकणे ही एक वेगळीच प्रगती आहे.’ दरम्यान, शिल्पा शेट्टीने अद्याप ईडीच्या नुकत्याच झालेल्या कारवाईवर जाहीरपणे भाष्य केलेले नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला