मोदींचे गुलाम महाराष्ट्र हिताचा विचार कसे काय करतील? फॉक्सकॉन प्रकल्पाच्या मुद्द्यावरून वागळे कडाडले

मुंबई – वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला (Gujarat) गेल्यानं आरोप-प्रत्यारोप सुरु असताना मुख्यमंत्री शिंदेंनी त्याचं खापर महाविकास आघाडीवर (MVA) फोडलं आहे. गेली दोन वर्षे कंपनीला जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारकडे बोट दाखवलं आहे.

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पावर जवळपास ९० टक्के चर्चाही केली होती. पण सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरात राज्यात गेला, याचे नेमके गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे. या प्रकल्पातून १ लाख रोजगार निर्माण होणार होते. एवढा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांनी काय करायचे असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, आता याच मुद्द्यावरून जेष्ठ पत्रकार निखील वागळे (Journalist Nikhil Wagle) यांनी शिंदे सरकारवर प्रहार केला आहे. महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला गेला यात आश्चर्य काय? मोदींचे गुलाम महाराष्ट्र हिताचा विचार कसे काय करतील? फडणवीस यांची बांधिलकी महाराष्ट्रापेक्षा मोदींशी आहे आणि शिंदे फक्त होयबा आहेत. असं वागळे यांनी म्हटले आहे.