पत्रकार Nikhil Wagle यांचे भाषण पुण्यात होऊ देणार नाही -धीरज घाटे

Nikhil Wagle Speech In Pune : आपल्या तोकड्या बुद्धीचे प्रदर्शन सातत्याने करून सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle Speech) यांचे पुण्यात भाषण होऊ देणार नाही. कायदा व सुव्यवस्था रखाण्यासाठी पोलिसांनी सदर भाषणाला परवानगी नाकारावी, अशी मागणी पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी पुणे पोलिसांना केली.

मागील काही दिवसांपूर्वी निखिल वागळे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारत रत्न लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केले होते.

केवळ प्रसिद्धीसाठी वागळे हे सातत्याने अशी भाष्ये करून सवंग लोकप्रियता मिळवत असतात. त्यांच्या भाषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा वादग्रस्त माणसाचे भाषण पुण्यासारख्या शांतता प्रिय शहरात ठेऊन पुण्याची शांतता बिघडवत असेल. तर ते भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही. जर पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही त्यांचे भाषण उधळून लावू, असा कडक इशारा घाटे यांनी दिला.

पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी घाटे यांच्यासह सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, राहुल भंडारे , राघवेंद्र मानकर माजी नगरसेवक महेश वाबळे, स्मिता वस्ते, प्रशांत हरसूले ,पुष्कर तुळजापूरकर हे उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या : 

Ajit Pawar | ‘आयत्या बिळावर नागोबा’ असणारे हे लोक दुसऱ्याचा पक्ष फोडणारे ‘गद्दार’ आहेत

Supriya Sule | मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत सुप्रिया सुळे यांनी वेधले लक्ष

Ajit Pawar | पक्षाची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबद्ध होतो… आजही आहोत आणि भविष्यातही राहू