Pune | आळंदी येथे गीता भक्ती अमृत महोत्सवचे आयोजन ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान

Pune : परमपूज्य श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांच्या ७५ वर्षांच्या दिव्य प्रवासानिमित्ताने भारतातील गीता परिवाराने बहुप्रतीक्षित गीता भक्ती अमृत महोत्सवाची घोषणा १ फेब्रुवारी रोजी पुण्यातील प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

पवित्र इंद्रायणी नदीच्या तीरावर संतनगरी आळंदी, पुणे (Pune) येथील शांत परिसरात आठवडाभर चालणारा हा महोत्सव ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.

आदरणीय अध्यात्मिक गुरु, परमपूज्य स्वामीजी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांच्या ७५ व्या जन्मदिनानिमित्त हा अध्यात्मिक अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. महाराजांना त्यांचे भक्त स्वामीजी म्हणून संबोधतात.

पत्रकार परिषदेला प्रमुख वक्त्यांमध्ये, गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ संजय मालपाणी, गीता भक्ती अमृत महोत्सव आयोजन समितीचे कार्याध्यक्ष श्गिरीधारीजी काळे, गीता परिवार राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि विश्वस्त  प्रदीपजी राठी (Pradeepji Rathi) सोबतच समन्वय समितीचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा हे प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ संजय मालपाणी यांनी आगामी महोत्सवाबद्दल उत्साह व्यक्त करताना सांगितले की, “गीता भक्ती अमृत महोत्सव हा केवळ एक कार्यक्रम नसून; एक अध्यात्माचा, आपल्या स्वतःच्या भारतीय संस्कृतीचा आणि निस्वार्थभावनेचा महोत्सव आहे.

हा महोत्सव सर्वांसाठी एक धार्मिक मेळावा ठरावा ही स्वामीजींची दृष्टी निःसंशय देशभरातील लाखो लोकांना एकत्र आनंद साजरा करायला प्रेरित करेल. हा कार्यक्रम आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या भव्यतेचा आणि त्याचा येणाऱ्या पिढ्यांवर होणाऱ्या प्रभावाचा पुरावा आहे. विविध पार्श्वभूमीतील संत, योगी, अध्यात्मिक नेते आणि विचारवंतांच्या या भव्य मेळाव्यामुळे देशाच्या नैतिकतेचे जतन करण्यावर महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची अपेक्षा आहे.”

या महोत्सवात ४५० हून अधिक कलाकार, रामायण, श्रीमद्भागवत कथा, वेदशास्त्र संवाद, २००० हून अधिक वैदिक गुरुंचा ८१ कुंडीय महायज्ञ, कृतज्ञता ग्यापन पर्व तसेच महान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान यासोबतच धर्माच्या आणि वेद तत्त्वावरील समृद्ध चर्चा यांचा समावेश असलेल्या नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रमाची हमी आयोजकांनी दिली आहे. या महोत्सवाचा मूख्य उद्देश भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा अधोरेखित करणे आणि सहभागींमध्ये एकता आणि सौहार्दाची भावना वाढवणे हा आहे.

गीता भक्ती अमृत महोत्सव २०२४ हा अध्यात्म आणि संस्कृतीचा अप्रतिम संगम असल्याचे सांगत वक्त्यांनी गीता परिवारातर्फे सर्वांना या शुभ सोहळ्यात सामील होण्यासाठी आमंत्रण दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

देशातील सर्व घटकांना मदत करणारा सर्वसमावेश अर्थसंकल्प – मंत्री छगन भुजबळ

Jayant Patil | निराशाजनक,नकारात्मक आणि नाविन्य नसलेला अर्थसंकल्प! जयंत पाटील यांची तिखट प्रतिक्रिया

Interim Budget 2024 | निवडणुका आल्यानंतर का होईना पंतप्रधानांनी सांगितलं की सुटाबुटातल्या मित्रांच्या पलीकडेही हा देश आहे- ठाकरे