अयोध्येतून परतलेले एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या काळजीपोटी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Eknath shinde : नुकत्याच झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करुन अहवाल सादर करावा, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावामध्ये बाधित झालेल्या पिकांची शिंदे यांनी पाहणी केली.या पावसामुळे उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावेळी संपर्कमंत्री दादाजी भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन् डी. आदी उपस्थित होते.

 

दरम्यान, राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका 7596 शेतकऱ्यांना बसला आहे. अमरावतीसह, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात 242 गावांना अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. या शेतकऱ्यांना त्वरित मदत दिली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणंवीस यांनी केली. अमरावती महसूल विभागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर अमरावती इथं ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, ज्या शेतकऱ्यांच नुकसान झाले आहे, अशा या सात हजार पाचशे शह्यानव शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने तत्काळ मदत दिली जाईल आत्तापर्यंत साधारण पणे अमरावती विभागाचा विचार केला तर तीन वेळा अशा प्रकारची आपत्ती ही अमरावती विभागात आलेली आहे. मागच्या दोन्ही आपत्तींच्या संधर्भात आपण पंचनामे पूर्ण करून आपण ते मदतीला पात्र केलंय याही संधर्भात आपण ते पूर्ण करू आणि गारपीट ग्रस्त किंवा असे अवकाळी ग्रस्त जे शेतकरी आहेत यांच्या पाठीशी राज्य सरकार निश्चितपणे उभं राहील.