Nilesh Lanke | लोकसभेसाठी आमदारकीचा राजीनामा देऊन आपण अभिमन्यूसारख्याच चक्रव्यूहात प्रवेश केलाय

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पारनेर विधानसभा (Parner Assembly 2024) मतदारसंघाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी काल अखेर आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्षांना आपण राजीनामा पाठवत असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. सुपा इथं कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.

आमदारकीचा राजीनामा देण्यावर लंके म्हणाले की, लोकसभेची निवडणूक लढविताना विरोधकांकडून आपल्याला अडचणीत आणलं जाऊ शकलं असतं. विरोधकांकडे वकिलांची फौज आहे. त्यामुळं पुढं जाऊन काही अडचण होऊ नये, म्हणून मी राजीनामा दिला.

लोकसभेसाठी आमदारकीचा राजीनामा देऊन आपण अभिमन्यूसारख्याच चक्रव्यूहात प्रवेश केला आहे, असे निलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले. पारनेरकरांनी मला आमदार म्हणून निवडून दिलं होतं. विधानसभेच्या निवडणुकीला सहा महिने बाकी असतानाच मी राजीनामा देतोय, त्यामुळे माझ्या मतदारांना, कार्यकर्त्यांना या निर्णयाबाबत सांगणं महत्त्वाचं वाटतं. पण लोकसभा निवडणूक लढविणं आपल्या सर्वांच्या स्वाभिमानासाठी, सन्मानानाठी गरजेचं आहे, त्यामुळं मी राजीनामा दिला आहे, असे लंके म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल