Amravati Lok Sabha 2024 | नवनीत राणांच्या अडचणी वाढल्या; अमरावतीत चौरंगी लढतीची शक्यता

भाजपकडून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज अखेर अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha 2024) मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.

आज बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून नवनीत राणांविरोधात उमेदवाराची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब यांनी प्रहार पक्षामध्ये प्रवेश केला असून त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून (Amravati Lok Sabha 2024) उमेदवार म्हणून घोषित केलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता महायुती मधील गटपक्ष असलेल्या प्रहार पक्षानं बूब यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे इथे चौरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल