Karan Kundrra | अभिनेता करण कुंद्राची नवी कार घरातून चोरीला? अभिनेत्याचे करोडो रुपयांचे नुकसान

Karan Kundrra Car Missing | प्रसिद्ध अभिनेता करण कुंद्राबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नुकतेच अभिनेत्यासोबत असे काही घडले की त्याला धक्काच बसला. या अभिनेत्याचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. करण कुंद्राच्या घरातून त्याची नवीन आलिशान कार चोरीला गेल्याने त्याची झोप उडाली आहे. खुद्द अभिनेत्यानेच आता त्याच्या चाहत्यांना ही धक्कादायक माहिती दिली आहे. करण कुंद्राने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

करण कुंद्राने व्हिडिओ शेअर करून माहिती दिली
करण कुंद्राने (Karan Kundrra) त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेता असे म्हणताना ऐकू येतो, ‘मित्रांनो, ज्याने जोक केला तो अजिबात मजेदार नाही. जर तुम्ही माझे मित्र असाल तर – ही माझी नवीन कार आहे. हा विनोद नाही. कृपया! ही खोड्यांसाठी वेळ नाही, मी अजून नीट गाडी चालवत नव्हतो. आता कार गायब आहे.” एवढेच नाही तर करण कुंद्राने एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे ज्यामुळे तो आणखी अडचणीत येऊ शकतो. त्याची कार खरोखरच चोरीला गेली असेल तर ती शोधणे अशक्य होऊ शकते.

कारमध्ये सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आली नव्हती
करण कुंद्राने ‘नवीन कारमध्ये सुरक्षा व्यवस्था नाही, ट्रॅकिंग नाही, कॅमेराही नाही, पण माझी गाडी कुठे आहे? प्लीज मित्रा, असं करू नकोस.’ असा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे करण कुंद्राला कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागू शकते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Mahesh Tapase | गुजरातच्या भूकंपावेळी मदतीला सर्वात प्रथम धावणारे शरद पवारांच्या योगदानाचा शहांना विसर

Amit Shah | अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, जय शाह कोणता क्रिकेट खेळला म्हणून बीसीसीआयचा सचिव केला?

Loksabha Election 2024 | “मतांसाठी शहीदांचा बाजार मांडला, उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, शाहांच्या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं