४.३ लाख कोटींच्या 5G स्पेक्ट्रम एअरवेव्ह केवळ १.५ लाख कोटींना का विकल्या गेल्या?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) यांनी केंद्राने केलेल्या 5G स्पेक्ट्रम (5G spectrum) च्या लिलावावर प्रश्न  उपस्थित केला आहे. 5G स्पेक्ट्रम अ‍ॅक्शन ने केंद्राला विक्रमी ₹ १.५ लाख कोटींची कमाई केली असे सांगितले जात आहे, परंतु महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ४.३ लाख कोटी किमतीच्या एअरवेव्ह केवळ १.५ लाख कोटींना का विकल्या गेल्या?

केंद्राने या तोट्याचा विक्रमी लिलाव केला हे रंगवून सांगितले जात आहे. पक्षपातीपणा लपविण्यासाठीचा हा एक उपद्व्याप आहे का, असा  रोखठोक सवाल क्लाईड क्रास्टो यांनी  केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या (NCP) या आरोपांना आता भाजप (BJP) कसं उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.