पेट्रोल नाहीतर ‘हे’ इंधन मिळणार अवघ्या 15 रुपयांत; गडकरींची मोठी घोषणा

मुंबई – आता पेट्रोलची (Petrol) गरज भासणार ना, डिझेल (Diesel) किंवा सीएनजीसारख्या महागड्या इंधनाची. ऑगस्ट महिन्यापासून इथेनॉलवर चालणाऱ्या कार लवकरच मार्केटमध्ये येणार आहे. अशी घोषणा नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली. ऑगस्ट महिन्यात इथेनॉलवर चालणारी कार मार्केटमध्ये येईल. भाजपने काल (23 जून, शुक्रवार) मुंबईत गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. मोदी @ 9 मोहिमेअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्र्यांनी ही माहिती दिली.

येत्या ऑगस्टमध्ये टोयाटो कंपनी ही १०० टक्के बायोइथेनॉलवर चालणारी चारचाकी गाडी लाँच करणार असून त्यात केवळ १५ रुपयात एक लिटर इंधन उपलब्ध होईल, अशी घोषणा देखील त्यांनी  केली. गडकरी म्हणाले की, बायोइथेनॉलवर चालणारी ही गाडी प्रदूषणशून्य असेल. त्यापाठोपाठ अशा स्कूटरही बाजारात येतील. भविष्यात ट्रक, ट्रॅक्टरसह सगळी वाहने  इथेनॉलवर धावतील. आजपासून पाच वर्षांत भारत ऑटोमोबाइल उत्पादनात जपानला मागे टाकून जगात पहिल्या क्रमांकावर असेल.

दुर्गम व ग्रामीण भागात विकास महत्त्वाचा आहे. रिफॉर्म, परफॉर्म या सुत्रावर विकास होतो. देशात ऊर्जा क्षेत्रात १८ लाख कोटींच्या तोट्यात आहेत. म्हणून ऊर्जा क्षेत्रात बदल करतोय. सौर ऊर्जा वापर वाढवतोय. आम्ही ग्रीन पॉवर तयार करतोय. कार्बन न्यूट्रल देशाच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत, असेही त्यांनी म्हटले.