भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेंचा सहभाग आढळला नाही, पोलिसांची न्यायालयात माहिती

Pune : भीमा कोरेगाव हिंसाचार(Bhima Koregaon Violence) प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide of Shiv Pratishthan) यांच्या विरोधात 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासामाध्ये संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सहभाग आढळला नसल्याच पोलीसांनी न्यायालयात सांगितलं आहे. त्याचबरोबर राज्य मानवी हक्क आयोगालाही त्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आलीय.

दुसऱ्या बाजूला या प्रकरणात ज्या इतर 41 आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.1 जानेवारी 2018 ला भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेल्या हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेंचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांच्यासह आणखी काही पुरोगामी संघटनांनी केला होता. हे आरोप केल्यानंतर संभाजी भिडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

तक्रारीनुसार पोलिसांनी तपास केला. त्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात कोणताही पुरावा मिळून आला नाही. त्यामुळे त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आलेला नाही, असे संभाजी भिडे यांचे वकील पुष्कर दुर्गे यांनी सांगितले. दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे संभाजी भिडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.