‘कितीही पक्ष एकत्र आले तरी या देशातील जनता ही मोदींच्याच नेतृत्त्वावर विश्वास ठेवते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले’

पुणे – संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे निकाल हाती आले आहेत. १०६ पैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. ९ नगरपंचायतींचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली असून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.

भाजपाने २४ नगरपंचायती जिंकल्या असून सर्वाधिक ३८४ जागा मिळवल्या आहेत. २०१७ मध्ये भाजपाकडे नगरपंचायतीत ३४४ सदस्य होतेसध्याच्या निकालाबद्दल बोलायचं गेल्यास भाजपा (३८४ ) पहिल्या क्रमांकावर असून यानंतर अनुक्रमे राष्ट्रवादी (३४४), काँग्रेस (३१६) आणि शिवसेनेचा (२८४) क्रमांक आहे. मात्र २०१७ च्या निकालाशी तुलना केली तर भाजपाच राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरत असून राष्ट्रवादी दुसऱ्या, शिवसेना तिसऱ्या आणि काँग्रेस चौथ्या क्रमांवर फेकला गेला. भाजपाने सर्वाधिक नगरपंचायती जिंकतानाच सदस्य संख्येतही पहिला क्रमांक मिळवला आहे.

दरम्यान, या निवडणूक निकालावर आता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जनतेचा कायम कौल हा विकसनशील भारतीय जनता पक्षाला होता आणि तो कायम राहील हे आजच्या निकालांतूनही पुन्हा स्पष्ट झालंय.भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत. कितीही पक्ष एकत्र आले तरी या देशातील जनता ही मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याच नेतृत्त्वावर विश्वास ठेवते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि मतदार बंधु – भगिनींचे मनापासून आभार ! असं लांडगे यांनी म्हटले आहे.