आता सर्व मंदिरे ब्राह्मणमुक्त करण्याची वेळ आली आहे – पुरुषोत्तम खेडेकर

बुलढाणा  :   नुकतीच संयोगीताराजे छत्रपती (Sanyogeetaraje Chhatrapati) यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली. मात्र या पूजेवरून वाद निर्माण झाला आहे.  संयोगीताराजे छत्रपती यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट देखील टाकली होती. या पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे. आता या वादात मराठा सेवा संघाने देखील उडी घेतली आहे.

मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, मंदिरात संयोगीता राजे भोसले यांच्याशी गैरव्यवहार केला. पंढरपूरसारखे राज्यातील सर्व मंदिर भटमुक्त करावेत अशी मागणी त्यांनी केली. आता मंदिरे ब्राह्मणमुक्त करण्याची वेळ आली आहे, ब्राह्मणांच्या ऐवजी मंदिरात बहुजन सामजातील मुला-मुलींची नियुक्ती करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. खेडेकर यांच्या या वक्तव्यानं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सावरकर यांनी असं म्हंटलं होतं की, सर्व हिंदू एक आहेत. इथं पुरोणोक्त आणि वेदोक्त असं काही नाही. संयोगीता राजे भोसले यांच्याबाबतीत घडलेला प्रकार निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला हे लाजीरवाणे आहे. हिंदू धर्मातील उतरंड आहे. वर्णिय, जातीय व्यवस्था आहे तिचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले.