टिपू सुलतानचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही – धीरज घाटे

Tipu Sultan: ज्याने असंख्य हिंदूंची कत्तल केली ज्याने अनेक लोकांचे बळजबरी धर्मांतर करून त्यांचा अमानुष छळ केला अशा धर्मांध विकृती असलेल्या टिपू सुलतान ची जयंती महाराष्ट्रात साजरी केली जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही त्याचे उदात्तीकरण होऊ देणार नाही पोलिसांनी वेळीच असल्या प्रवृत्तीला आळा घालावा अन्यथा या प्रवृत्तीचा बिमोड करण्यास आम्ही समर्थ आहोत असा इशारा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी दिला.

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन तातडीने अशी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना शासन करण्याची मागणी केली. नुकतीच पुण्यात टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यात आली.

पुढे बोलताना घाटे यांनी पोलिसांनी या बाबत गंभीरतेने दखल घेऊन ह्या लोकांचा शोध घेऊन कारवाई करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी अशी मागणी केली. या शिष्टमंडळामध्ये घाटे यांच्यासह सरचिटणीस पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर ,राजेंद्र शिळीमकर ,राहुल भंडारे ,वर्षा तापकीर, महेश पुंडे यांचा समावेश होता.

महत्वाच्या बातम्या-

‘त्याने बंद खोलीत दिलेलं वचन पुर्ण केलं..’, कर्णधारपदी विराजमान झाल्यावर सूर्याचा रोहितबाबत खुलासा

‘…तर ऐश्वर्या रायचा बलात्कार करायला मिळालं असतं’; अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य

आदेश देऊनही होल्ड न काढणाऱ्या बँकावर कार्यवाही करा – स्वाभिमानी