देशात पुन्हा एकदा रामराज्याची संकल्पना अधिक गतीमान होणार – सुनिल तटकरे

Sunil Tatkare :- साडे पाचशे वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर आज अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना (Ram Mandir Pranpratishta) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाली. आज मंगलमय वातावरणात देशातील कोट्यावधी जनतेने या मंगलमय क्षणाचे जयघोषात स्वागत केले. आज आपण प्रभू रामचंद्राच्यासमोर नतमस्तक होत असताना या देशात पुन्हा एकदा रामराज्याची संकल्पना अधिक गतीमान होणार असून या भावनेतून आपण सारेजण जमलो आहोत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने या मंगलमय क्षणाच्या राज्यातील तमाम जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त प्रदेश कार्यालयासमोर लाडू वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रभू श्री रामाच्या प्रतिमेला प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पुष्पहार अर्पण केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, पक्षाचे कोषाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, आमदार शेखर निकम, कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, युवक अध्यक्ष सुनिल गिरी, महिला कार्याध्यक्षा आरती साळवी, मनिषा तुपे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यां मोठया संख्येने उपस्थित होत्या.

महत्वाच्या बातम्या-

Ram Mandir Ayodhya : संपूर्ण पुणे शहर बनले राममय; धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन

Ram Mandir Ayodhya : रामाने रावणाचा नि:पात करण्याचा निश्चय केला त्या मंदिरात मोदींनी केली महापूजा

Santosh Shelar | माओवाद्यांशी संबंधित पुण्यातील बेपत्ता संतोष शेलार परतला; रुग्णालयात दाखल

आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हीच प्रभू श्रीरामाची खरी पूजा; सावित्रीच्या लेकींनी नाकारली प्राणप्रतिष्ठेची सुट्टी