Pune News | शेख सल्ला दर्गा अतिक्रमण प्रकरणावर निघाला शांततामय तोडगा

Pune News : पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पालिका आयुक्त विक्रम कुमार,शेख सल्ला दर्गाचे विश्वस्त, राष्ट्रीय अल्पसंख्यंक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत शेख सल्ला दर्गा (Sheikh Salla Dargah) अतिक्रमण प्रकरणावर  तोडगा निघाला असून पुणेकरांच्या (Pune News) सलोखा, सामंजस्याचे दर्शन घडले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला यांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात शनिवारी पोलिस आयुक्त कार्यालयात सर्व संबंधितांच्या बैठकीत दर्गाच्या विश्वस्तांनी २०१९ नंतरचे अतिक्रमण स्वताहून काढण्याची भूमिका घेतली. या बैठकीत शांततेत संवाद झाला आणि तोडगा निघाला, असे अली दारूवाला यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

अमितेश कुमार विक्रम कुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त पवार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पोलिस उपआयुक्त संदीप गील, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला, दर्गा विश्वस्त आदी उपस्थित होते. दर्गा संबंधी तणावाच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन अली दारूवाला यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन – Pankaja Munde

तुम्ही ज्या जागा जिंकू शकणार नाहीत, त्याच मविआ तुम्हाला देत आहे- Nitesh Rane

खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका; Chandrashekhar Bawankule यांचा पलटवार