Ram Mandir Ayodhya : रामाने रावणाचा नि:पात करण्याचा निश्चय केला त्या मंदिरात मोदींनी केली महापूजा

Modi In Rameshwaram | अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरात आज श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून सर्व देशात चैतन्य, उत्साह आणि भक्तीचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. दुपारी साधारण 12 वाजता या सोहळ्यात ते सहभागी होतील. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी काल तामिळनाडूमधल्या रामेश्वरम इथल्या कोदंडधारी राम मंदिरात पूजा केली. एक हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या या पुरातन मंदिराच्या जागी श्रीरामांनी रावणाचा नि:पात करण्याचा निश्चय केला होता, असं मानलं जातं.

शिवाजी मानकर

या सोहळ्यासाठी हजारो साधू, संत आणि भाविक अयोध्येत आले आहेत. प्राणप्रतिष्ठेआधीच्या धार्मिक विधींचा काल शेवटचा दिवस होता. विविध पवित्र नद्यांच्या पाण्यानं श्रीरामाचा स्नान सोहळा काल पार पडला. दरम्यान, संपूर्ण देशाचंच नव्हे, तर जगाचं लक्ष लागून राहिलेल्या आज होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं अयोध्या नगरीत जनसागर लोटला असून चौक, रस्ते, गल्ल्यांमध्ये भाविकांचे जयघोष, शोभायात्रा, रांगोळ्या, भित्तिचित्रं, विद्युत रोषणाई, सुंदर पणत्यांची सजावट, भजन, संगीताचे कार्यक्रम यांची लयलूट सुरू आहे. या सर्व भाविकांसाठी आरोग्य सेवा तत्पर असून भोजनाची व्यवस्था करण्यासाठी विविध सामाजिक, धार्मिक संस्था पुढे आल्या आहेत. सर्व ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अयोध्येच्या सीमांवर नाकाबंदी करण्यात आली असून वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली आहे. ड्रोनच्या माध्यमातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात येत आहे. जागोजागी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून भाविकांच्या उत्साहाच्या आड नं येता ते आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

या ऐतिहासिक सोहळ्याला देशातील सर्व प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक संप्रदायांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. विविध आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींसह समाजाच्या सर्व स्तरातील लोकही या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. अनेक राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि विविध क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्वे या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येत दाखल झाली आहेत. श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या बांधकामाशी संबंधित श्रमजीवींशी मोदी संवाद साधणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवंय; नक्षलवाद्यांची कोल्हेकुई झाली सुरु

Ram Mandir Pran Pratishta : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवला जाणार?

Women’s Health: 50 व्या वर्षी निरोगी राहू इच्छिता? रोज ही एक गोष्ट खायला सुरुवात करा