आजचा दिवस सुंदर, मी आज गाणार नाही; अमृता फडणवीस यांनी गायनास नकार दिल्याने पत्रकारांची निराशा

Amruta Fadanvis – प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिर आजपासून सर्वांसाठी खुले झालं आहे. काल केवळ निमंत्रित साधू, संत आणि मान्यवर व्यक्तींनाच दर्शन घेण्याची परवानगी होती. गेल्या अनेक दिवसांपासून जगभरातील हजारो साधू, संत आणि भक्तांच्या उपस्थितीने संपूर्ण अयोध्या भक्तिरसाने दुमदुमत होती.

दरम्यान, या सोहळ्याचा उत्साह संपूर्ण भरतात पाहायला मिळाला. मात्र यात सध्या चर्चा होतेय ती गायिका अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याची.  अमृता फडणवीस या गायन क्षेत्रात आपले योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ज्या ज्या वेळी संधी मिळते त्या त्या ठिकाणी आपल्या गायन कलेचे प्रदर्शन करत असतात मात्र काल त्यांनी चक्क गाणे गाण्यास नकार दिला.

रामललाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर अमृता फडणवीस या पुण्यात जेव्हा माध्यमांना प्रतिक्रिया देत होत्या, तेव्हा त्यांना गाण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी आज गाणार नसल्याचं म्हणत त्याचे कारणही सांगितले. दरम्यान राम मंदिराच्या (Ram Mandir) लोकार्पण सोहळ्यावर देखील अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. आजचा दिवस सुंदर होता, सगळ्यांची इच्छा पूर्ण झालीये. आज रामलल्ला विराजमान झालेत. त्यामुळे मन मोठं ठेवून आजच्या दिवसाचा जल्लोष करा, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली. यावेळी काही पत्रकार निराश झाल्याचे देखील सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

Ram Mandir Ayodhya : संपूर्ण पुणे शहर बनले राममय; धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन

Ram Mandir Ayodhya : रामाने रावणाचा नि:पात करण्याचा निश्चय केला त्या मंदिरात मोदींनी केली महापूजा

Santosh Shelar | माओवाद्यांशी संबंधित पुण्यातील बेपत्ता संतोष शेलार परतला; रुग्णालयात दाखल

आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हीच प्रभू श्रीरामाची खरी पूजा; सावित्रीच्या लेकींनी नाकारली प्राणप्रतिष्ठेची सुट्टी