Ram Mandir Ayodhya : संपूर्ण पुणे शहर बनले राममय; धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन

Ram Mandir Ayodhya : अयोध्येत आज होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुण्यात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. शहरात ठिकठिकाणी हा आनंद सोहळा पाहण्यासाठी मोठे पडदे लावण्यात आले आहेत. शहरातल्या विविध श्रीराम मंदिरांसह अन्य देवी-देवतांच्या मंदिरांत, गृहनिर्माण संस्थांमध्ये आज धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं आहे.

शिवाजी मानकर

घरोघरी श्रीरामाचे चित्र असलेले आकाशकंदिल; भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. चौकाचौकांतही भगव्या पताकांच्या माळा, श्रीरामांचं भव्य आकर्षक चित्र, विद्युत रोषणाई असं उत्सवी वातावरण कालपासूनच दिसत आहे. सदाशिव पेठेतील ऐतिहासिक सदावर्ते श्रीराम मंदिरात यानिमित्त आज सकाळपासून दुर्मिळ असा सौर याग होणार आहे. यावेळी मातृशक्ती ग्रुपच्या 50 महिलाभक्त; राम तांडव स्तोत्राचं पठण करणार आहेत. त्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वेळी दुपारी साडेबारा वाजता सौरयागाची पूर्णाहुती ब्रम्हवृंदातर्फे केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवंय; नक्षलवाद्यांची कोल्हेकुई झाली सुरु

Ram Mandir Pran Pratishta : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवला जाणार?

Women’s Health: 50 व्या वर्षी निरोगी राहू इच्छिता? रोज ही एक गोष्ट खायला सुरुवात करा