पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशभरात राममय वातावरण झाले आहे – आनंद परांजपे

Anand Paranjape – अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना (Ram Mandir Pranpratistha) सोहळा संपन्न झाला आहे. यामुळे संपूर्ण देशभरात राममय वातावरण निर्माण झाले असून ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात भजन व महाआरतीचे आयोजन केले होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली.

यावेळी ठाण्यातील शांतीनगर येथील बुवा कृष्णा प्रभाकर शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळाचे अध्यक्ष मोतिराम सावंत व प्रथमेश सावंत यांच्या उपस्थितीत मंडळाच्या कलाकारांची भजन संध्या आयोजित करण्यात आली होती. पखवाज – स्वप्नील सावंत, तबला वेदांशू बटवाव व अनिकेत दळवी, झांज-अजित साकटकर, कोरस- प्रशांत पेडणेकर, संतोष शिरसाट, नामदेव रेवडेकर, प्रथमेश सावंत, प्रतिक वाळके, स्वराज शिरसाट आदी कलाकारांनी साथ देत या भजनात रंग भरला.

यावेळी ठाणे मध्यवर्ती कार्यालयाबाहेर रांगोळीची भव्य आरास करण्यात आली होती. यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करुन आणि प्रभू श्री रामाचा जयजयकार करत प्रभू श्री राम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा वनिताताई गोतपागर, माजी नगरसेविका अंकिता शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, परिवहन सदस्य नितिन पाटील, विधानसभा अध्यक्ष विजय भांबरे, वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष अविनाश पवार, सोशल मिडीया सेल अध्यक्ष कल्पेश मिठबावकर, ब्लाॅक अध्यक्ष समिर पेंढारे, निलेश फडतरे, सुधाकर नाईक, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजित सावंत, जयवंतराव पाटकर, संतोष सहस्रबुद्धे, अप्पा चव्हाण, पदाधिकारी दीपक पाटील, सौरभ धुमाळ, महिला पदाधिकारी अरुणा पेंढारे, सुवर्णा खिल्लारी, वंदना खानोळकर, माया केसरकर, उज्वला येडे, मनिषा कांबळे, सुनिता भोसले, उषा जाधव,सुहानी बारणे, शामल दाभाडे, शामा भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी हंगेरीयन उद्योजक बोटोंड बोर्डास यांनी, ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयातील, प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त आयोजिलेल्या भजन व महाआरतीत उत्साहाने उपस्थित राहून दर्शन घेतले.

महत्वाच्या बातम्या-

Ram Mandir Ayodhya : संपूर्ण पुणे शहर बनले राममय; धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन

Ram Mandir Ayodhya : रामाने रावणाचा नि:पात करण्याचा निश्चय केला त्या मंदिरात मोदींनी केली महापूजा

Santosh Shelar | माओवाद्यांशी संबंधित पुण्यातील बेपत्ता संतोष शेलार परतला; रुग्णालयात दाखल

आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हीच प्रभू श्रीरामाची खरी पूजा; सावित्रीच्या लेकींनी नाकारली प्राणप्रतिष्ठेची सुट्टी