Santosh Shelar | माओवाद्यांशी संबंधित पुण्यातील बेपत्ता संतोष शेलार परतला; रुग्णालयात दाखल

Santosh Shelar – नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याचा आरोप असणारा आणि  २०१० पासून बेपत्ता असणारा पुण्यातील संतोष वसंत शेलार (Santosh Vasant Shelar)उर्फ ​​विश्व उर्फ ​​पेंटर हा तरुण आता परत आला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बंदी घातलेल्या सीपीआय माओवादी संघटनेशी कथित संबंध असल्याचा त्यावर आरोप आहे. संतोष शेलार याला शहरातील ससून रुग्णालयात (Sassoon Hospitals) दाखल करण्यात आले असून तो सध्या एटीएसच्या नजरेखाली आहे.

इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, 2010 पासून बेपत्ता असलेला संतोष शेलार हा 19 जानेवारी आणि 20 जानेवारीच्या मध्यरात्री पुण्यातील भवानी पेठ(Bhawani Peth)  भागातील काशेवाडी झोपडपट्टीत घरी परतला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी एटीएसला माहिती दिली आणि त्यालाही उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शिवाजी मानकर

आयपीसी आणि यूएपीएच्या कलमांखाली २०११ मध्ये राज्य एटीएसच्या ठाणे युनिटने दाखल केलेल्या गुन्ह्यात शेलार हवा होता. एटीएसच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने शेलारचा शोध घेतल्याची पुष्टी केली. शेलारला वैद्यकीय समस्या असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे ससून रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शेलार यांच्या कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, त्यांना आत्मसमर्पण करायचे आहे.

दरम्यान, काही वर्षापूर्वी पुण्यातून बेपत्ता झालेला हा युवक नक्षलवादी झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. तो छत्तीसगड येथील माओवादी संघटनेत तो सहभागी झाला असल्याची माहिती समोर आली होती.   पुण्यातील खडक पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा भाऊ संदीप शेलार (Sandeep Shelar)  याने दिली होती. संतोष शेलार हा एका कबीर कला मंचच्या संपर्कात होता. तो स्वत: चित्रकार होता. 2010 साली तो पुण्यातून मुंबई येथे चित्रकला स्पर्धेसाठी गेला होता. त्यानंतर तो घरी परतला नव्हता.

महत्वाच्या बातम्या-

मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवंय; नक्षलवाद्यांची कोल्हेकुई झाली सुरु

Ram Mandir Pran Pratishta : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवला जाणार?

Women’s Health: 50 व्या वर्षी निरोगी राहू इच्छिता? रोज ही एक गोष्ट खायला सुरुवात करा