विवाह समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमांना 50 व्यक्तींनाच परवानगी; कोरोना प्रतिबंधाचे नवे आदेश जारी

वर्धा :- राज्यात गेल्या काही दिवसांपासुन कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने आणि मोठया प्रमाणात वाढ होत आहे. सोबतच ओमायक्रॉन रुग्णांची संख्यादेखील वाढत असल्याने या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हयात नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहे.

नव्या निर्बंधाप्रमाणे जिल्हयात बंद ठिकाणी किंवा मोकळया जागेत आयोजित करण्यात येणा-या विवाह समारंभाना केवळ 50 व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवाणगी असेल. कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक मेळावा किंवा कार्यक्रम यांना देखील 50 व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल.

सदर कार्यक्रम बंदिस्त किंवा मोकळया जागेत असले तरी 50 व्यक्तींचीच मर्यांदा राहतील. अंतिम संस्कारासाठी जास्तीत जास्त 20 लोकांनाच उपस्थित राहता येईल. कोरोना प्रतिबंधासाठी यापुर्वी शासनाने निर्गमित केलेले आदेशाचे सुध्दा पालन करावे लागणार आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायदयातील तरतुदी नुसार सदर निर्बंध लावण्यात येत असलयाचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कळविले आहे.