मुखेडमधील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी करावी लागतेय मोठी कसरत

मुखेड-  नांदेड जिल्ह्यातील मुखेड मध्ये पी एम किसान योजनेतील शेतकऱ्यांना योजनेत लाभ घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून तहसील कार्यलयात शेतकऱ्यांना विनाकारण चकरा माराव्या लागत आहेत व मोठ्या प्रमाणात आर्थिक मिळवणूक केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणा सुरळीत करावी या योजने संदर्भात आलेल्या तक्रारी निकाली काढाव्यात अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी निवेदनातून केली आहे.

केंद्रसरकारच्या पी एम किसान योजनेच्या महत्वकांक्षी योजनेत बोगस लाभार्थींचा सहभाग असल्याच्या संशयाने सर्व लाभार्थ्यांना ईकेवायशी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे आहे. योजनेचा १० वा हप्ता १ जानेवारी २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. यापुढील हप्ता मिळवण्यासाठी ई केवायशी बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र शासनाने सीएससी केंद्र चालकांना प्रति शेतकरी १५ रुपये शुल्क निश्चित केले आहे. मात्र सीएससी केंद्र चालकांकडून या ऐवजी ५० ते १०० रुपये शेतकऱ्यांकडून घेऊन आर्थिक पिळवणूक करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुखेड तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून पी एम किसन योजनेचे पोर्टल कधी बंद तर कधी सुरू असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनाकारण तहसील कार्यलयाला खेटे मारावे लागत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याचे अनेक तक्रारी प्रलंबित असून यात सर्वसामान्य शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधित पोर्टलवर काम करणाऱ्या व्यक्तींकडून अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याचे शेतकरी वर्गात चर्चा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवून, तक्रारी सोडवण्यासाठी तालुक्यात सज्जानिहाय कॅम्प घ्यावे अशी मागणी तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी निवेदनातून केली आहे.

सरकारने शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधी अंतर्गत २००० रुपयांचा हप्ता वर्षातून तीनवेळा देणारी योजना २०१८ पासून सुरू केली आहे. या योजनेसाठी पात्र असून देखील आजप्रयन्त एकही हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या मुखेड तालुक्यात खूप मोठी आहे. याविषयी तलाठी व महसूल प्रशासनाशी संपर्क केला असता संबंधित कामासाठी ऑपरेटर नेमवलेला आहे त्यामुळे सदरील कामे तहसील मधून करता येतात अशी उत्तरे मिळत आहेत. या योजनेस अनेक शेतकरी पात्र असून देखील वंचित असलेल्या शेतकऱ्यांना, या योजनेचा लाभ मिळत नसल्याने आर्थिक परिस्थिती हालाकीच्या असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकरी सन्मान निधीच्या लाभासाठी अनेक शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी सारख्या चकरा मारत आहेत. दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या नावात व खाते नंबरमध्ये चुका झाली आहे. यामुळे एका व्यक्तीचे पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा होणे. काहींना एक दोन हप्ते जमा झाले नंतर हप्ते बंद झाले. अशा अडचणी सोडवण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. या वंचित असलेल्या लाभधारकांना लाभ मिळवून देण्यासाठी तालुक्यात सज्जानिहाय कॅम्प घेऊन हे प्रश्न सोडवले पाहिजेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पीएम किसान योजने अंतर्गतचा दहावा हप्ता १ जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खत्यात जमा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी ई केवायशी केली नसेल तरी मिळणार आहे मात्र पण पी एम किसान योजने अंतर्गत मार्च २०२२ नंतर मिळणारे हप्ते मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई केवायशी करणे बंधनकारक आहे. तसेच सीएससीवर ई केवाशी करण्यसाठी १५ रुपये शुल्क आकारले जातील. अशी माहिती केंद्र सरकार च्या सीएससी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार राकेश यांनी दिली आहे. त्यामुळे मार्च 2022 पासून पुढचे हप्ते मिळवण्यासाठी ई केवाशी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.