रोहित शर्मासोबत बरंच काही चुकीचं झालं…; रितिकाची एक कमेंट मुंबई इंडियन्समध्ये भूकंप आणणार!

Rohit Sharma Wife Ritika Sajdeh: इंडियन प्रीमियर लीगची (IPL 2024) सर्वात यशस्वी फ्रँचायझी असलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) बदलाच्या टप्प्यातून जात आहे. संघाने आपला चॅम्पियन कर्णधार रोहित शर्माला आगामी हंगामापूर्वी कर्णधारपदावरून हटवले. रोहितच्या जागी मुंबईने हार्दिक पांड्याला आपला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. फ्रँचायझीच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये मोठी निराशा आहे. त्यामुळे संघाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. अशा परिस्थितीत आता संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर (Mark Boucher) यांनी एका पॉडकास्टमध्ये रोहितच्या जागी हार्दिकला कर्णधार का करण्यात आले? हे सांगितले. परंतु बाउचरच्या या पॉडकास्ट व्हिडिओवर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहची एक टिप्पणी होती, ज्याने हे सिद्ध केले की कर्णधारपदातील बदल सामान्य पद्धतीने झाला नाही.

बाउचर पॉडकास्टमध्ये म्हणत आहेत की हार्दिकला कर्णधार बनवणे हा ‘क्रिकेट संबंधित निर्णय’ होता आणि लोकांनी त्याबद्दल ‘भावनिक’ होऊ नये. ते म्हणाले की, हार्दिकला नवा कर्णधार बनवणे हा मुंबई इंडियन्सच्या बदलाचा एक भाग आहे.

ते म्हणाले, ‘मला वाटते हा निव्वळ क्रिकेटचा निर्णय होता. आम्ही हार्दिकला परत आणण्याची संधी पाहिली. आमच्यासाठी हा बदलाचा काळ आहे. भारतात बरेच लोक भावनिक होतात, पण तुम्हाला खेळ आणि भावनांना एकमेकांपासून वेगळे ठेवावे लागेल. तो मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे. तो दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये गेला, पहिल्या वर्षी विजेतेपद जिंकले आणि दुसऱ्या वर्षी उपविजेतेपद मिळविले. त्यामुळे स्पष्टपणे त्याचे नेतृत्व कौशल्यही चांगले आहे.’

मार्क बाउचरच्या या व्हिडिओवर कमेंट करताना रितिकाने लिहिले की, ‘यामध्ये अनेक गोष्टी चुकीच्या आहेत.’ रितिकाच्या या कमेंटमुळे मुंबई इंडियन्स संघात खळबळ उडाली आहे. रोहित शर्मा हा मुंबईचा कर्णधार असून त्याने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याच बरोबर त्याची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे.

हार्दिकने 2015 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले आणि 2021 पर्यंत त्याने 6 हंगाम खेळले. यानंतर, तो 2022 मध्ये गुजरात टायटन्समध्ये सामील झाला आणि त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्याच सत्रात त्याने संघाला चॅम्पियन बनवले. इतकेच नाही तर दुसऱ्या सत्रात हार्दिक रेच्या नेतृत्वाखालील गुजरात संघ उपविजेता राहिला.

महत्वाच्या बातम्या –

भाजप आमदाराच्या गोळीबारामुळे आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत – Nana Patole

Atif Aslam | “पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करून दाखवाच”, मनसेचं बॉलिवूडकरांना थेट आव्हान