Seema Haider : सीमा हैदरला आली ‘बिग बॉस 17’ ची ऑफर

Seema Haider Big Boss Offer: पाकिस्तानातून भारतात दाखल झालेल्या सीमा हैदर (Seema Haider) ला सध्या चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. पाकिस्तानातून चार मुलांसह भारतीय प्रियकर सचिनसाठी पळून आलेली सीमा हैदर सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. मात्र आता प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ (Bigg Boss) मधून सीमा हैदरला ऑफर आली आहे.

सीमा हैदर (Seema Haider) ने दावा केला आहे की, छोट्या पडद्यावरील शोमधून तिला आणि सचिन मीनाला अनेक ऑफर आल्या आहेत. रिॲलिटी शो ‘बिग बॉस’मधून तसेच कॉमेडी कार्यक्रमांसाठीही ऑफर आल्याचा दावा सीमा हैदरने केला आहे. सीमाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, चार मुलांची पाकिस्तानी आई सीमा हैदर (Seema Haidar) पब्जी गेम खेळणारा भारतीय तरुण सचिन माणीच्या प्रेमात पडली. ही महिला प्रेमात इतकी वेडी झाली होती की, ती अवैधरित्या नैपाळमार्गे तिच्या चार मुलांसह भारतात आली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली. सध्या भारतीय मीडियामध्ये सीमा हैदर हा चर्चेचा विषय बनला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-
शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा

अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ नियोजित वेळेतच सायंकाळी विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी

भाईजानचा थाटच न्यारा! गळ्यात भगवं उपरणं टाकून पोहचला CM शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला