सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत देणार अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा आव्हान?

Loksabha Election 2023: खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यास भाजपाने पवार घरातील कुणालातरी उमेदवारी द्यायचे असे ठरवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु झाली आहे. असे प्रत्यक्षात घडले तर मतदारांना या ठिकाणी नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहण्यास मिळेल.

याआधी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांचे पुत्र पार्थ पवार लढणार अशी चर्चा सुरु होती. पण अचानक सुनेत्रा पवारांची चर्चा सुरु झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सुनेत्रा पवार या एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया, हायटेक टेक्स्टाईल पार्क कापड उद्योगांशी अनेक संस्था जोडल्या. त्यामुळे अनेक कुटुंबातील महिलांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळाला, ग्राम स्वच्छता, स्मार्ट व्हिलेज, पर्यावरण संतुलित गाव या माध्यमातून सक्रिय आहेत. शिक्षण क्षेत्रात सक्रीय आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठात सिनेट सदस्य, सुनेत्रा पवारांचा पुणे जिल्ह्यात विशेषतः बारामती विधानसभा मतदारसंघावर प्रभाव आहे.

दरम्यान, यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतक्रिया दिली आहे. दिल्लीत काय दडपशाही चालते हे सगळा देश बघतोय…आपल्याकडे लोकशाही आहे. आपण सगळ्यांनी याचा मान सन्मान केला पाहिजे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय. तसंच माझ्याविरुद्ध कुणी ना कुणी लढणारच, त्यामुळे असं झालं तर या निर्णयाचं पूर्ण ताकदीने स्वागत केलं पाहिजे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-
शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा

अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ नियोजित वेळेतच सायंकाळी विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी

भाईजानचा थाटच न्यारा! गळ्यात भगवं उपरणं टाकून पोहचला CM शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला