भाईजानचा थाटच न्यारा! गळ्यात भगवं उपरणं टाकून पोहचला CM शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला

Salman Khan Video: गणेश चतुर्थीचा दिवस (Ganesh Chaturthi 2023) हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. जो प्रत्येक भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी साजरा केला जातो आणि या वर्षी तो 19 सप्टेंबर 2023, मंगळवारी साजरा केला गेला. हा 10 दिवसांचा गणोत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण आपापल्या घरी गणपतीचे स्वागत केले आणि त्याची मूर्ती बसवली.

अनेक मोठ मोठ्या कलाकारांनी आपल्या घरी गणेशोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यातच नुकतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) त्यांच्या घरी बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले.

यावेळी शाहरुखसोबतच बरेच कलाकार दिसले. मात्र सर्वांचे लक्ष वेधुन घेतले ते बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan). सध्या सोशल मीडियावर सलमान खानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावेळी सलमान खान त्याची बहीण अर्पिता आणि मेहुणा आयुष शर्मा हे देखील त्याच्यासोबत दिसले. याप्रसंगी सलमान खान मरून रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसला. यावेळी सीएम शिंदे यांच्याकडून सलमानला गणरायाची मुर्ती भेट देण्यात आली. सलमानच्या गळ्यातील भगव्या रंगाच्या उपरण्याने मात्र सर्वाचं लक्ष वेधलं.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई महापालिकेचे भूखंड व उद्याने दत्तक देण्याचे धोरण रद्द करा; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी

वंचित बहुजन आघाडीचा Gautam Adani – Sharad Pawar भेटीवरून कॉंग्रेसला टोला !

ससूनमधील रुग्णांना ‘Virtual Reality’द्वारे ‘दगडूशेठ’ बाप्पाचे दर्शन