दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाने जो तमाशा मांडला आहे तो संतापजनक आहे; केदार दिघे यांची टीका 

मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Eknath Shinde and party chief Uddhav Thackeray) यांच्यात कमालीचा दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत दसऱ्याच्या दिवशी नक्की शिवसेनेचा मेळावा होणार की एकनाथ शिंदे गटाचा याबाबत उलटसुलट चर्आचा सुरु आहे.

शिवाजी पार्कवरती दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्यासाठी शिंदे गटाच्यावतीनं मुंबई महापालिकेकडं अर्ज करण्यात आला आहे. शिंदे गटातील आमदार सदा सरवरणकर यांनी हा अर्ज दाखल केला आहे. या अगोदर शिवसेनेकडून देखील अर्ज करण्यात आला होता त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.  शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा व्हावा, यासाठी परवानगी मिळवण्यासाठीचे पत्र शिवसेनेने २२ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेला पाठवले आहे. आता एकनाथ शिंदे गटानेही याच जागी दसरा मेळावा व्हावा, यासाठीचे परवानगी मागणारे पत्र मुंबई महापालिकेला पाठवले असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता उद्धव ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी भाष्य केले आहे. दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाने जो तमाशा मांडला आहे तो संतापजनक आहे.बाळासाहेबांच्या विचारांचे असल्याचे। सांगायचे आणि बाळासाहेबांनी विचारपूर्वक आपला वारसदार नेमलेल्या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात अडथळे निर्माण करायचे.गद्दारांनो कुठे फेडाल हे पाप! असं दिघे यांनी म्हटले आहे.