Palghar Mob Lynching Case : महाराष्ट्र सरकार साधू हत्याकाडांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास तयार

मुंबई – पालघर साधू हत्याकांड प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यास महाराष्ट्र सरकारने तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र सरकारने तपास हस्तांतरणाला आपली हरकत नसल्याचे सांगितले असून तसे शपथपत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.

पालघरच्या गडचिंचले गावात दोन वर्षांपूर्वी जमावानं दोन साधूंची ठेचून हत्या केली होती. या प्रकरणी सीआयडीकडून (CID) तपास सुरु होता. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी सातत्यानं भाजपकडून करण्यात येत होती. राज्यात सत्ता बदलानंतर आता नव्या सरकारनं हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास प्रतिज्ञापत्राद्वारे मान्यता दिली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग केला जाणार आहे.