पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना? निलेश राणेंचा थेट सवाल

मुंबई – मनी लाँड्रिंगच्या (money laundering case) आरोपांचा सामना करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (ED on Nawab Malik) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विशेष न्यायालयाने नवाब मलिकविरुद्धच्या खटल्याची सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. यावर कोर्टाने नवाब मलिक यांचे डी-गँगशी (d company) संबंध होते असं निरीक्षण नोंदवलं आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) यांचा थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभाग होता असेही न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय नवाब मलिकांनी गोवावाला कंपाऊंड मिळवण्यासाठी कट रचल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. मंत्री नवाब मलिक यांनी हसीना  पारकरसोबत (Hasina Parkar) वारंवार बैठका घेतल्या आणि मनी लाँड्रिंग केलं असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं आहे.

दरम्यान, न्यायालयातील या घडामोडींवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांची मलिक यांच्यामुळे चांगलीच गोची झाली आहे. भाजप नेते निलेश राणे याबाबत म्हणाले, पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना? नवाब मलिक मधला असू शकतो. राजकारणात जेव्हापासून आलो तेव्हापासून चा हा संशय आहे कारण मुंबई बॉम्ब ब्लास्ट घटनेपासून तुम्ही एक वाढीव बॉम्ब ब्लास्ट जाहीर केला तो नेमका कोणाला वाचवण्यासाठी होता? तेव्हा मीडिया वेगळी होती, तुम्ही वाचलात. असं त्यांनी म्हटले आहे.