Pune News | नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना मिळणार प्रिंटरची सुविधा..!

Pune News | नवी पेठ (Navi Peth) येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असणारा स्मशान परवाना मृतांच्या नातेवाईकांना घ्यावा लागतो. मात्र काही वेळेस नातेवाईकांकडे कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने परवाना मिळत नाही. त्यामुळे प्रिंट काढणे किंवा झेरॉक्स काढणे त्याठिकाणी शक्य नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच स्मशान परवाना मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार होत नाहीत. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विलंब तर होतोच पण अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मृतांच्या नातेवाईकांना, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना तिष्ठत राहावे लागत होते. प्रिंटर व झेरॉक्स ची व्यवस्था नसल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून स्मशान परवाना (Pune News) मिळण्यात नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या.

नागरिकांची होणारी गैरसोय पाहता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर व गिरीश जैन यांच्या पुढाकाराने या वैकुंठ स्मशानभूमीत आरोग्य निरीक्षकांकडे प्रिंटर सुपूर्त करण्यात आला. यावेळी माझ्या समवेत गिरीश जैन, आरोग्य निरीक्षक तमन्नार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर सरचिटणीस राम पालखे आणि पास केंद्र निरीक्षक संजय सोनवणे आदी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत