उन्हाळ्यात फ्रिजमधील पाणी पिण्याऐवजी माठातील पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले, जाणून घ्या त्याचे फायदे

उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी लोक त्यांच्या पेहरावापासून खानापानापर्यंत अनेक गोष्टीत बदल करतात. उन्हाळ्यात थंड पेय पिण्याला लोक प्राधान्य देतात. अगदी पाणीही थंड करुन पिले जाते. पूर्वी पाणी थंड करण्यासाठी माठाचा (डेरा, मडके) उपयोग केला जायचा. परंतु आता फ्रिज आल्याने अनेकजण माठांचा फार कमी वापर करताना दिसत आहेत. मातीच्या भांड्याऐवजी फ्रिजमधील पाणी पिण्याकडे जरी लोकांचा कल वाढला असला तरीही मातीच्या भांड्यात पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्याबद्दल जाणून घ्या-

माठ कसा असावा: उन्हाळ्यात पाणी थंड करण्यासाठी काळ्या मातीच्या भांड्याचा वापर करावा.

माठ कुठे ठेवावा: मातीची भांडी बहुतेकदा लोक त्यांच्या स्वयंपाकघरात ठेवतात. जर तुम्ही स्वयंपाक घरात माठ ठेवत असाल तर तेथे हवा खेळती आहे की नाही, याची खात्री करा.

माठ कधी बदलावे : माठ तीन महिन्यांच्या आत बदलावा, पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्यास दीड महिन्यात भांडे बदलणे आवश्यक आहे.

माठ कसे स्वच्छ करावे: माठ कधीही त्यात हात घालून स्वच्छ करू नका. अशाप्रकारे साफसफाई केल्याने माठाची घाण त्याच्या छिद्रांमध्ये जाते. यामुळे माठ साफ होत नाहीत. त्यामुळे माठामध्ये पाणी ओतणे आणि ते तीन-चार खंगाळणे हाच माठ स्वच्छ करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.

माठातले पाणी पिण्याचे फायदे
1. क्षारता वाढते: मातीच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात क्षारता वाढते. हे आपल्या रक्ताचे पीएच संतुलित करते. आपल्या दिनचर्येमुळे शरीरातील ऍसिडिटी वाढत आहे, अशात माठातले पाणी पिणे शरीरासाठी चांगले राहिल.

2. पाणी थंड ठेवते: फ्रिजच्या तुलनेत माठ संतुलित आधारावर पाणी थंड ठेवते. असे म्हणतात की मातीच्या घागरीतून थोडेसे पाणी टपकले पाहिजे कारण त्यातून काही पाणी बाहेर पडते आणि बाष्पीभवन होते.

3. क्षार वाढवते: मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी पुरेसे क्षार पुरवते. या पाण्याची क्षारता वाढवण्यासाठी त्यात नदीचे दगड ठेवा किंवा चांदीही ठेवू शकता.

(टीप: लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नयेत. तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)