महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची शिंदेंची तळमळ आणि त्यांचा विनम्र स्वभाव कौतुकास्पद – मोदी

एकनाथ शिंदेंचे मोदींनी केले तोंडभरून कौतुक

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आपल्या कुटुंबीयांसह भेट घेतली. महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांवर आपण पंतप्रधानांसोबत आपण चर्चा केल्याचं मुख्यमंत्र्यांनी एका ट्विटर संदेशात सांगितलं. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, या भेटीवर आता थेट पंतप्रधानांनी भाष्य केले असून मुख्यमंत्र्यांचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे.अशा शब्दात त्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.