कवी डॉ. निलेश वाघमारे यांच्या बहुप्रतीक्षित ‘क्षणस्थनील बाकी शून्यच’ या काव्यसंग्रहाचे रविवारी प्रकाशन

Pune – सुप्रसिद्ध कवी डॉक्टर निलेश वाघमारे (Dr. Nilesh Waghmare) यांच्या बहुप्रतीक्षित क्षणस्थनील बाकी शून्यच (kshanasthnil Baaki Shunyach)  या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत आहे. रविवार दिनांक २१/८/२०२२रोजी संध्याकाळी ६ वाजता नटसम्राट निळू फुले नाट्यमंदिर नवी सांगवी येथे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पिंपरी चिंचवड मधील लोकप्रिय नेतृत्व शंकर जगताप, नगरसेवक शशिकांत कदम, सांगवी पिंपळे गुरव डॉ असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप ननावरे असोसिएशनचे सेक्रेटरी प्रवीण सूर्यवंशी आणि खजिनदार डॉक्टर सुनील पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

सांगवी पिंपळे गुरव डॉक्टर असोसिएशन (Sangvi Pimple Guruv Doctors Association)  दरवर्षी डॉक्टरांच्या कलागुणांना अभाव देण्यासाठी एक स्नेहसंमेलन आयोजित करत असतात. या स्नेहसंमेलनाचे नावच जल्लोष आहे. डॉक्टर प्रदीप ननावरे आणि डॉक्टर सूर्यवंशी या कामांमध्ये अत्यंत दक्षतेने कार्य करतात आणि त्यांच्या प्रेरणेतून डॉक्टर निलेश यांनी त्यांचा काव्यसंग्रह लिहिला आहे. या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे ,सीनियर पोलीस इन्स्पेक्टर सुनील टोणपे हे सुद्धा  हजर राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य निमा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास जाधव यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहेत.

डॉक्टर निलेश वाघमारे यांच्याविषयी

डॉक्टर निलेश वाघमारे हे विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असतात. निलेश वाघमारे हे एक अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व असणारे कवी आहेत. विपुल अशी शब्दसंपत्ती असणाऱ्या या कवीचे वैद्यकीय क्षेत्रातील काम उल्लेखनीय असून त्यांची ही साहित्य मुसाफिरी वाखाणण्याजोगी आहे. आजच्या धकाधकीच्या काळात डॉक्टर मंडळी अतिशय बिझी असतात तरीही डॉक्टर निलेश यांनी आपला छंद जोपासला ही कौतुकास्पद आहे.