‘माझ्या हृदयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो कोरलेला आहे, तो कुणी काढू शकत नाही’

आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा म्हणजे उशिरा सूचलेलं शहाणपण आहे - पाटील

जळगाव : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांची शिवसंवाद (shiv samvad) यात्रा सुरु आहे. ते आज जळगावात येत आहेत. त्यापूर्वीच शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना चिमटे काढले आहेत. अत्यंत मार्मिक सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांना पाटील यांनी लक्ष्य केले आहे.

ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा म्हणजे उशिरा सूचलेलं शहाणपण आहे. शिवसेनेने (shivsena) महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे. असे कितीही आले आणि गेले तरी मला काही फरक पडत नाही. मी या मतदारसंघातून हॅट्रिक करणार आहे. हे मी तुम्हाला डंके की चोटपर सांगतो.

आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो कार्यालयातून काढायला उशीर झाला. मात्र फोटो लवकरच निघतील. माझ्या हृदयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो कोरलेला आहे. तो कुणी काढू शकत नाही, असं किशोर पाटील म्हणाले. आम्हाला गद्दार म्हणतात मग शिवसेनेने युतीतून बाहेर पडून काँग्रेस सोबत आघाडी केली. तुमचं हे कृत्य महाराष्ट्राशी गद्दारी नव्हती काय? असा सवाल त्यांनी केला आहे.