Deepak Mankar| गुन्हेगारीमुक्त पुणे शहरासाठी राष्ट्रवादी आक्रमक, मानकरांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Deepak Mankar : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात शैक्षणिक आणि आयटी उद्योगाच्या भरभराटीमुळे देशभरातून पुण्यात राहण्यास येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्यावाढी सोबतच शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होत असून गुन्हेगारीमुक्त पुणे शहरासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर(NCP city president Deepak Mankar)  यांनी केली आहे.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून आज देण्यात आले. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनी तसेच नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांना रोडरोमियांचा त्रास होत असल्याच्या अनेक घटना पुढे येत असल्याने ऑफिसेस व महाविद्यालये सुटतेवेळी मार्शलच्या माध्यमातून ग्रस्त घालण्यात यावी, कोयतागँग सारख्या गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

शहरात अनेक भागांमध्ये अवैद्य हॉटेल्स, पब, हुक्का पार्लर सुरू असल्याने आजची युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. शहरात खुलेआमपणे मसाज सेंटरमध्ये बेकायदेशीर कृत्य केले जाते, ऑनलाइन गेम पार्लर, जुगार मटका चालवणाऱ्यांमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून हे सर्व थांबवण्यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याची गरज असल्याची भावना यावेळी दीपक मानकर यांनी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष दत्ताभाऊ सागरे, महिला अध्यक्ष प्रिया गदादे, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, युवती अध्यक्ष पुजा झोळे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम मातोळे, प्रवक्ते भैय्यासाहेब जाधव, शिवाजी नगर विधानसभा अध्यक्ष अभिषेक बोके, ॲड.पुष्कर दुर्गे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात