वाचाळवीर जितेंद्र आव्हाड यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून पुण्यात नोंदवण्यात आला निषेध

Jitendra Aavhad On ShriRam – माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न सातत्याने करत असतात. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे शिर्डी येथे शिबिर आयोजित केले गेले होते या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उदघाटनावर बोलत असताना एक वादग्रस्त विधान केले आहे.

राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिबिरात बोलत असताना उपस्थित केला.

दरम्यान, या वक्तव्यानंतर आव्हाड यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी रामाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपाने त्यांचा निषेध नोंदवण्यात सुरुवात केली आहे. पुण्यातल्या अलका टॉकिज चौकात जितेंद्र आव्हाड यांची प्रतीकात्मक तिरडी काढून निषेध नोंदवण्यात आला. तसंच पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात